मनोगत

अध्यक्षीय मनोगत :


“शुन्यालाही देता येते किंमत,

फक्त त्यासाठी कुणीतरी एक होवून,

शुन्यापुढे उभे राहण्याची दाखवावी लागते हिम्मत”

मग अशीच हिम्मत दाखवीत शून्य अवस्थेत असलेली गिरनार अर्बन क्रेडीट को. ओप. सोसायटी लि. नागपूर हाती घेत त्यात नव्याने जीव ओतत हे गिरनार रुपी रोपटे हळू-हळू पुन्हा आपला विश्वास जनसामन्यांचे मनात रुजत चाललेले आहे. हि छोटीशी गिरनार पतसंस्था आपले जाले नागपूर शहरात पसरवित आहे. 160 पेक्षा जास्त परिवाराचे संगोपन करीत 25 कोटी पेक्षा जास्त रुपयाच्या ठेवी चा विश्वास संपादन केलेला आहे. मात्र हे संपूर्ण प्रशिक्षित कर्मचारी आणि विश्वासू दैनिक प्रतिनिधी आणि जाणते संचालक मंडळाचे शिस्तबद्ध प्रयत्नामुळे शक्य होवून हे रोपटे आता वृक्षात रुपांतरीत झाले आहे.

       हे सर्व करीत असताना स्वतःला नियमाचे चाकोरीत बांधून घेणे गरजेचे आहे. कारण अनियंत्रित वाहन कधी अपघातग्रस्त होईल, हे कुणालाच माहिती नसते. त्या करिता नियमांचे पालन करीत कायद्याचे चाकोरीत राहून आपला व्यवसाय करीत राहणे, शासनाचे परिपत्रक, घटना दुरस्ती, कायद्यात दुरस्ती व परिस्थितीनुरूप धोरण व मुल्यांची सांगड घालत आपले कार्य करीत राहणे  क्रमप्राप्त आहे. त्यातल्या त्यात आर्थिक संस्था म्हटले कि, आपला व्यवसाय गतिमान करण्यासाठी त्याला कायदे, नियम यात तोलमाप करूनच पुढे जाने आवश्यक आहे. नाहीतर मोठे-मोठे कल्पवृक्ष कधी धाराशाही होतात, हे काळात सुद्धा नाही. मग, फक्त शिल्लक राहते ती बोंबाबोंब आणि आरोप-प्रत्यारोप. सरतेशेवटी नशिबी नामुष्की पश्च्यातापाच.

        म्हणूनच आपले गिरनार पतसंस्थेचे सर्व अंग-सभासद, कर्मचारी आणि दैनिक प्रतिनिधी आपले कक्षेत राहून त्यास दिलेले अधिकार, कर्तव्य आणि जवाबदारी पार पडतील; त्या करिता नियमावली/उपविधी/सेवानियम स्वीकारण्यात आलेले आहे. सहकारी क्षेत्रात होणारे बदल आणि वेळोवेळी शासन करेल ते कायद्यातील बदल ग्राह्य धरून आपल्या जबाबदार्या पार पाडतील, अचा मला विश्वास आहे.

      सोबत या गिरनार रुपी वृक्षाचे वटवृक्षात रुपांतर होवून त्यात अधिक शेकडो परिवार विश्वासाने आपली आर्थिक उन्नती करतील हीच श्री गजानन महाराजांचे चरणी प्रार्थना.

श्री कृष्णा खोपडे

व्यवस्थापकीय मनोगत :

मागे वळुन पाहता…

        ही  गोष्ट आहे,एका छोट्या सहकारी प्रवासाची ! त्यातुन पुनर्जीवीत झालेल्या गिरनार पतसंस्थेची,18 जानेवारी 2002 चा एक शुभ दिवस उजळला आणि मित्र परिवाराची  बैठक सुरु झाली. विषय एकच होता, कार्य करत असलेल्या पतसंस्थेत सुरु असलेले गचाळ व्यवस्थापन यातुन मार्ग काढण्याचा. शक्य झाल्यास या चळवळीच्या माध्यमातून सर्व  सामान्याच्या  विकास करण्याचा, सहकाराचा सुगंध दरवळण्याचा. तसे  हे उद्देशीष्ट  नियोजितच होती. परंतु ही वेळ निवडण्याची मुख्य कारण सहकार क्षेत्रातील  कार्यकर्त्यांची चिकाटी, कसोटी अंगिकारलेल्या कामाची आत्मीयता पहावयाची होती. त्यांची पारख घ्यायची होती. मग चर्चा करत असतांना नवीन पतपेढी स्थापन करायचीकी, बंद कारभार असलेल्या एखाद्या पतसंस्थेला पुनर्जीवित करायचं, याबाबत चर्चा करताना नवीन पतपेढी स्थापन न करता बंद असलेल्या एखाद्या पतपेढीला पुनर्जीवित करायचे. नव वर्षाच्या उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून सहकाराची ज्योत प्रज्वलित केली आणि ती तेवत ठेवण्याची शपथ  घेण्यात आली. त्यासाठी वाटत त्या खस्ता खाण्याची, जवळ असलेली मालमत्ता विकण्याची, सातत्याने झिझण्याची तयारी झाली. सरतेशेवटी बंद असलेली पतपेढी गिरनार अर्बन क्रेडीट को-ऑप सोसायटी या संस्थेला पुनर्जीवित करण्याचे ठरविले. या पतसंस्थेचे नाव तेच ठेवायचे की, त्यात बदल करायचे यावर संभ्रमावस्था  होती, परंतु जे नामकरण या पतपेढीला संस्थापकांनी केलेले आहे, तेच योग्य आणि पूरक असल्याने हा कारभार पुढे सुरु ठेवण्याचे  दिशेने पावले उचलण्यात आले.

         ध्येयपूर्तीचा निश्चय झाला, रु. 35,450/- वसूल भागभांडवल आणि रु. 90,017.89/- इतके सभासद ठेवी असलेल्या खेळत्या भांडवलावर गिरनार परिवार पुन्हा एकप्रीत करण्याची संधी अनुप्रुत करण्याचा दृष्टीने कार्यभार सुरु झाला. परिवारावर नियंत्रण जेष्ठांचेच असावे, या करिता अध्यक्ष पदांची धुरा स्वत: न घेता सामाजिक कार्यकर्ते व राजकारणात सक्रीय असे श्री. कृष्णाजी खोपडे यांना देण्यात आली. जिद्द बाळगण्यास योग्य दिशेने काम केल्यास यश साध्य घेणे कठीण नाही. सभासद नोंदणी नव्याने सुरु झाली. मित्र परिवारासह अनेक नातेवाईक यांची नव्याने भर पडली, उत्साह द्विगुणीत होऊन पुन्हा नवीन सहकारी प्रवास सुरु झाला.

        सभासदांना बचत करण्यास उपयुक्त करणे, गरजेच्यावेळी कर्जरूपाने वेळीस मदत करणे हे पतपेढीचे मुख्य उद्दिष्टे समोर ठेऊन परिसरातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे, हे देखिल उद्दिष्ट समोर ठेवून अनेक योजना आखण्यात आल्या, अपेक्षापुर्ती उद्दोष्ट्पत्तीस झाली. शहरात गिरनार पतसंस्थेबद्दल नवीन विश्वास उत्पन्न होऊन नवीन सभासद बनविणे, भागभांडवल उभारणे, कर्ज मंजूर करणे हे नित्य नियमाची झाली. सतरंजीपुरा, तेलीपुरा येथील लहानश्या खोलीत सुरु झालेल्या पतसंस्था कार्यालयात कार्यकर्त्यांची व सभासदांची ये-जा वाढली. कार्यालय सकाळ-संध्याकाळ उघडू लागले. सुट्टी तर केव्हाच नाही. चैतन्याचा झरा वाहू लागला. हळुच 2005 साली मंदिराच्या बाजुला असलेल्या वास्तू श्रीकृष्ण कुंजाचे बांधकाम सुरु असताना स्वत:चे कार्यालय विकत घेण्याचा दृष्टीने सकारात्मक निर्णय घेऊन अवघ्या छोट्या कालावधीत संस्थेचे कार्यालय स्वमालकीच्या जागेवर स्थानांतरीत झाले. या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी माजी उपपंतप्रधान व तत्कालिन लोकसभा विपक्ष नेता श्री.लालकृष्णजी  अडवाणी,श्री.नितीनजी गडकरी,श्री.अमितजी शाह,श्री.देवेन्द्रजी फडवणीस या सारख्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती यास लाभली.

       सभासदांबरोबर गरजांची वाढ होऊ लागली. बचतीच्या नवीन योजनांची गरज निर्माण झाली म्हणून अनेक कायमस्वरुपी योजनांना सुरुवात करण्यात आली. पतपेढीच्या कारभाराबरोबरच परिसरातील जनसामान्यांसाठी विद्युत बिल संकलन केंद्रांची सुरुवात करण्यात आली. वैयक्तिक व तारण कर्जाच्या मर्यादा उपविधी दुरुस्ती करून सभासदांना वेळोवेळी मागणीप्रमाणे व पत पाहुन कर्ज वाटप करण्यात आले. संस्थेची  होत असलेली  सतत प्रगती लक्षात घेता कार्यक्षेत्र वाढ वार्डापुर्तीहुन नागपुर विभागापर्यंत झालेली आहे. या प्रवासात अवघ्या 153 सभासद संख्या असलेली  पतसंस्था 31 मार्च 2018 ला 15,363सभासदांपर्यंत पोहचली. कारभार हातात घेतला असता असलेले  वसूल भागभांडवल रु. 35,450 हुन रु. 7,66,58,100/-,राखीव निधी रु. 7,41,50,713/- तर सभासद  ठेवी 62 कोटी,कर्जवाटप 42 कोटी, व गुंतवणुक 33 कोटी इतकी भक्कम स्थिती आज संस्थेची आहे. पतसंस्थेचा कारभार करतांनागिरनार परिवाराच्या विकासा सोबतच जन सामान्याचा सेवेचा विसर गिरनार परिवाराला कधीच पडला नाही. पारडी-भांडेवाडी सारख्या मागासलेल्या भागात गरीब व होतकरु विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक केंद्र, गरीब जनतेसाठी मोफत रुग्ण वाहिनी, मोफत शववाहिनी व शवपेटी सेवा, यांसारख्या निरंतर सेवा संपूर्ण शहरासाठी कोणताही भेदभाव न करता सुरु आहेत. श्री क्षेत्र शेगाव ला गजानन सेवा प्रतिष्ठान ला 4.50 लाखाची देणगी, पारडी परिसरात गरीब जनतेसाठी उभारण्यात येत असलेल्या इस्पितळासाठी रु. 25 लाखाची मदत, व्यशनमुक्ती केंद्राला रु. 50 हजारचे अर्थ सहाय्य, जिल्हातील सहकार चळवळ बळकटीस ऋणाभार म्हणून रु. 10 लाखाची इमारत निधी, स्वच्छ पाणी विद्यार्थ्यांना मिळावे म्हणून अनेक विद्यालयांना वाटर कुलर, अपंग व्यक्तीस  ट्रायसिकलवाटप असे अनेक कार्य संस्थेने केली.
पतपेढीच्या या रथाचे घोडे कधी खेचाळले ! अश्यावेळी कार्यकर्ते भयभित झाले. सामाजिक संस्थेत जे होऊ नये ते झाले ,असे सर्वांना वाटले. काही जणांना संस्थेशी असलेला संबंध नकोसा झाला ,अश्यावेळी संस्थेच्या नेतृत्वाची कसोटी झाली.झाल्या प्रकाराने ते नेतृत्व हतबल झाले नाही तर नव्या जोमाने त्यांनी पावले उचललीत. वेळोच संस्थेचा कारभार सावरला. त्याचे फलित म्हणजे काय ? आजचा हा सोन्याचा दिवस. नागपूर विभागात गिरनार पतसंस्थेचे ओळख व नाव सर्वांच्या परिचयाचे आहे. 150 पेक्षा अधिक कर्मचारी व दैनिक प्रतिनिधींना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना त्याचे भविष्य सुनिश्चित करण्याचा दृष्टीने केंद्र व राज्य शासनाच्या सोशल सिक्युरिटी च्या सदराखाली येणाऱ्या सर्व प्रकारच्या कल्याणकारी योजना जसे :  कर्मचारी भविष्यनिधी, इ.एस .आय .सी, जी .आय .सी, ग्राच्युटी, बोनस  यांसारख्या योजनांची दखल संस्थेने घेतलेली आहे. आतापर्यंत जे काही केले ते खूप केले असे म्हणता येणार नाही, परंतु भविष्यात अनेक योजना सहकारी कायदा  व कर कायदे याची जोड साधुन राबविण्याचा मानस आहे. विद्युत वेगाने पुढे जाणाऱ्या जगात आपल्या पतसंस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन बरेच काही करण्यासारखे आहे. त्यासाठी मी, माझे संचालक मंडळ आणि माझे सहकारी  प्रयत्नशील आहेत आणि राहतील.

       या प्रवासात गिरनार संस्थेच्या कारभाराची दखल अनेक स्तरावर घेण्यात आली. मग राज्य फेडरेशन दीपस्तंभ पुरस्कार असो, विदर्भ फेडरेशनचे आदर्श पतसंस्था पुरस्कार असो वा नचिकेत प्रकाशनने दिलेला सर्वोकृष्ट सेवा व आदर्श पतसंस्था पुरस्कार असो या पेक्षा ही  अभिमानाची बाब म्हणजे  महाराष्ट्र शासनाचा नागपुर विभागातुन सहकार निष्ठ पुरस्कार- 2016 प्राप्त करणारी एकमेव संस्था म्हणुन गौरव गिरनार पतसंस्थेलाच मिळालेला आहे. असे 12 प्रतिष्ठीत पुरस्कार आपले  गिरनार संस्थेला प्राप्त झाले.

     आज गिरनार हे 18 हजारापेक्षा अधिक सभासदांचे कुटुंब आहे, याला उज्वल भवितव्य आहे. सहकाराची ज्योत तेवत ठेवण्याची प्रत्येकाची भावना आहे. एकमेकांचे सुख जाणुन घेण्याची इच्छा आहे. यातुन आपला व संपुर्ण गिरनार परिवाराचा उत्कर्ष साधता येईल .तसेच आपले जीवन सहकारमय बनवता येईल व श्रमाचे सार्थक होईल.

                                        जय सहकार ……. जय गजानन

                                                                                                                                                                                                        श्री राजेंद्र  घाटे