दैनिक बचत खाते (Pigmy Deposits) वर 2% थेट किंवा 4% प्रोडक्ट पद्धतीने व्याजदर

दैनिक बचत खाते (Pigmy Deposits)

खात्यावर मिळणारा व्याजदर: 2% थेट p.a थेट किंवा 4% प्रोडक्ट पद्धतीने

नियम:

१. गिरनार अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसायटी लि. तर्फे नेमलेल्या व त्याच्या जवळ दैनिक रक्कम गोळा करण्याचे गिरनार अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसायटी लि चे प्रमाणपत्र आहे. असे अधिकृत गिरनार अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसायटी लि नागपूर च्या वतीने रोज दैनिक हप्त्याची रक्कम वसूल करतील. वसूल केलेली रक्कम वसूल केलेल्या वेळेपासून 24 तासाच्या आत जमा करावी लागेल. (सुट्टीचे दिवस वगळता)
२. प्रत्येक महिन्याच्या अखेरीस खातेदाराने आपले पासबुक दैनिक प्रतिनिधी द्वारा संस्थेच्या कार्यालयात पाठवून किंवा स्वतः येऊन शिल्लक बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी. नंतर या बाबतीत संस्था जबाबदार राहणार नाही.
३. दैनिक हप्त्याचा भरणा रोजच्या रोज झाला पाहिजे. काही विशिष्ट अडचणी आल्यास पुर्वानुमतीने 8 दिवसाचे हप्ते एकसाथ घेतल्या जातील.
४. जे खाते 7 महिन्याच्या आत बंद होत असेल तर खातेदाराकडून व्यवस्थापन शुल्क @10% व 18% GST घेण्यात येईल.
५. जर 7 महिन्याच्या नंतर किंवा एका वर्षाच्या आत खाते बंद करीत असेल तर त्या खातेदारास व्याज दिले जाणार नाही. त्याच्याकडून घेणे असलेली राशी शिवाय कोणतीही कपात केली जाणार नाही.
६. दैनिक बचत ठेव खात्यावर जमा असलेल्या रकमेच्या 80% पर्यंत कर्ज देण्यात येईल. खातेदाराला असे कर्ज वर्षातून 2 पेक्ष्या अधिक वेळा घेता येणार नाही.
७. कोणत्याही खातेदाराने दैनिक ठेवीच्या कर्जाकरिता अर्ज दिल्यास जास्तीत जास्त 1 आठवड्याचा आत कर्ज दिले जाईल. असे कर्ज देताना शाखा व्यवस्थापक यांची मंजुरी आवश्यक राहील.
८. वरील प्रमाणे द्यावयाच्या कर्जाची रक्कम रु. 100 पेक्षा कमी असणार नाही. कर्ज मागताना खात्याचे पासबुक सोबत आणणे आवश्यक आहे.
९. दैनिक ठेवीवर दिल्या जाणाऱ्या कर्जावर व्याजाचा दर वेळोवेळी ठरविण्याचा अधिकार संचालक मंडळाला राहील.
१०. कर्जाची मुदत 10 महिन्यापेक्षा किंवा दैनिक ठेवीच्या मुदतीपेक्षा जास्त राहणार नाही. कर्ज घेतल्यानंतर सुद्धा दैनिक रक्कम भरावी लागेल.
११. दैनिक ठेवीची मुदत संपेपर्यंत जर वैयत्तिक किंवा pigmy कर्जाची पूर्ण परत फेड झाली नसेल तर कर्जाची बाकी रक्कम आणि त्यावरील व्याज दैनिक ठेवी मधून कापून घेण्यात येईल. उरलेली रक्कम खातेदारास परत करण्यात येईल, आणि तरीही कर्जाची रकामेची पूर्णतः परतफेड न झाल्यास कर्जदार कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील.
१२. दैनिक ठेवीच्या खातेदारास दर महिन्यात भरणा केलेल्या रकमेबद्दल गिरनार अर्बन क्रेडीट को-ऑप सोसायटी लि. नागपूरच्या प्रतिनिधी मार्फत पासबुक तपासून दिले जाईल. तसेच प्रतिनिधी जी वसूली करेल त्याची पावती आणि पासबुक प्रतिनिधी कडून न मिळाल्यास खातेदाराने गिरनार पत संस्थेकडे त्वरित तक्रार करावी.
१३. गिरनार अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसायटी लि. नागपूर चे पासबुक हरविल्यास स्वतः कार्यालयात येऊन खातेदाराला रु. 10 भरून नवीन पासबुक मिळू शकेल.
१४. खाते उघडताना खातेदाराने तो मैयत झाल्यास जमा असलेली रक्कम ज्याला द्यावयाची असेल त्या वारसदाराचे नाव व पत्ता स्पष्ट नमूद करावे.
१५. संयुक्त खाते असल्यास व त्यावरील एका किंवा अधिक खातेदाराचा मृत्यू झाल्यास या कारणास्तव खाते बंद करता येणार नाही. ह्यात असलेल्या खातेदारांनी किंवा वारसदारांनी मुदत संपेपर्यंत ठेव भरली पाहिजे. मुदत संपल्यानंतर ठेवीची रक्कम ह्यात खातेदारांना किंवा त्याच्या वारसदाराना परत करण्यात येईल.
१६. प्रत्येक खातेदाराने या बाबतीत गिरनार पत संस्थेचे नियम वाचले असून त्यांना ते मंजूर आहेत असे समजले जाईल. या योजनेच्या नियमात कोणतीही सूचना न देता बदल करण्याचा व अंमल बजावणी करण्याचा अधिकार गिरनार अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसायटी लि. नागपूर यांनी स्वतः कडे राखून ठेवले आहेत.
१७. दैनिक ठेवीची मुदत संपल्यानंतर ठेवीची पूर्ण परत फेड थेट 2% किवा 4% प्रोडक्ट पद्धतीने केल्या जाईल व संपूर्ण रकमेच्या परत फेडीसाठी खातेदारांनी स्वतः सोसायटी चे कार्यालयात येणे अथवा प्राधिकृत व्यक्तीला पाठविणे आवश्यक राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *